Monday, September 15, 2025
घरमहाराष्ट्रप्रबोधनकार ठाकरे वाचनालय वाचवून टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे ; पत्रकारांची एकजूट आणि...

प्रबोधनकार ठाकरे वाचनालय वाचवून टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे ; पत्रकारांची एकजूट आणि भवन निर्मिती हीच विजय वैद्य यांना आदरांजली

प्रतिनिधी : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय वाचवून ते टिकविणे आणि वाढविणे अतीशय महत्वाचे असून उपनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हे विजय वैद्य यांनी सुरु केलेले उपक्रम अविरतपणे सुरु ठेवणे त्याचप्रमाणे उत्तर मुंबई पत्रकार संघ क्षेत्रात पत्रकारांची एकजूट अबाधित ठेवून पत्रकार भवनाची निर्मिती करणे हीच विजय वैद्य यांना आदरांजली ठरेल अशा शब्दांत आपापल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उत्तर मुंबई पत्रकार संघ आणि मागाठाणे मित्र मंडळ आयोजित आदरांजली सभांमध्ये उपस्थित मान्यवरांनी विजय वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सरचिटणीस प्रवीण वराडकर, कोषाध्यक्ष रविंद्र राऊळ, ज्येष्ठ पत्रकार, कवी, साहित्यिक विजय तारी, ज्येष्ठ पत्रकार नितीन सावंत, छायाचित्रकार संदिप टक्के यांनी विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाची इमारत बोरीवली ठाणे भूयारी मार्ग प्रकल्पात जाणार आहे. या इमारतीतील ग्रंथालय/वाचनालयासाठी नवीन जागा मिळणे आवश्यक आहे. यासाठी मंत्रालय पातळीवर तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार सुरु आहे. या विषयाचा उहापोह सायंकाळी मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत करण्यात आला. तेंव्हा हे ग्रंथालय/वाचनालय वाचविणे, टिकविणे एवढेच नव्हे तर ते वाढविणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विजय वैद्य यांचे नांव बोरीवली कडील भूयारी मार्गाला देण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. विजय वैद्य यांच्या विविध आठवणींना उजाळा देऊन प्रा. नयना रेगे, विभाग संघटक शुभदा शिंदे, अमित मोरे, दादासाहेब शिंदे, योगेंद्र ठाकूर, सुभाष देसाई, वसंत सावंत, शाम साळवी, जयवंत राऊत, स्मीता डेरे, संजना वारंग, सुरेखा देवरे, राकेश वायंगणकर, हेमंत पाटकर, कीर्ती कुमार शिंदे, शाम कदम आदींनी आदरांजली वाहिली.*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments