Monday, September 15, 2025
घरमहाराष्ट्रकोल्हापूरशिक्षणापासून दूर फेकलेल्यांना मुक्त विद्यापीठाने आधार दिला. - डाॅ.प्रकाश देशमख

शिक्षणापासून दूर फेकलेल्यांना मुक्त विद्यापीठाने आधार दिला. – डाॅ.प्रकाश देशमख

कामेरी : ” शिक्षणापासून दूर गेलेल्या वंचित मुला-मुलींना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आधार दिल्याने अनेक तरुण,तरूणी,संसारी महिलांचे जीवन मुक्त विद्यापीठाच्या संधीमुळे ज्ञानाने उजळून निघाले आहे.” असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डाॅ.प्रकाश देशमुख ह्यांनी कामेरी येथील कर्मवीर शिक्षण संस्थेच्या बी.ए./बी.काॅम.अभ्यासकेंद्राच्या सदिच्छा भेटी प्रसंगी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अनिल पाटील होते.मुक्त विद्यापीठातील नोंदणी विभागाचे प्रमुख प्रवीण हुल्लाळे हेही या प्रसंगी उपस्थित होते. मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याबद्दल बद्दल प्रा.अनिल पाटील यांनी,” ज्ञानगंगा घरोघरी ह्या ब्रिदास साजेसे कार्य मुक्त विद्यापीठाकडून होत असताना विद्यापीठास अडचणी निर्माण करून गालबोट लावण्याचे काम होत असल्याची खंत व्यक्त केली.
डाॅ. प्रकाश देशमुख ह्यांनी कर्मवीर शिक्षण संस्थेतील मुक्त विद्यापीठाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करताना डाॅ. देशमुख म्हणाले,” मुक्त विद्यापीठ वंचितांना शैक्षणिक संधी निर्माण करण्यात कुठेही कमी पडणार नाही,याची ग्वाही देतो.”
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विलास बारपटे,भैरवदेव पतसंस्थेचे संस्थापक सुनील पाटील,पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस छाया पाटील, शिराळा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डाॅ.साकेत पाटील,हंबीरराव जेडगे,दीपक मुळीक, सुदाम राऊत, वर्षा चौगुले, चंद्रकांत पाटील,गजानन पाटील,रमेश बलवडकर ,उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. संजय पाटील यांनी केले.सूत्रसंचालन व आभार सुधीर खंडागळे यांनी मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments