Sunday, September 14, 2025
घरमहाराष्ट्रपनवेल मधील तक्का येथे "सिग्नल बंद अपघाताची घंटा"

पनवेल मधील तक्का येथे “सिग्नल बंद अपघाताची घंटा”

प्रतिनिधी : पनवेल मधील तक्का येथे सिग्नल बंद झाल्यामुळे अपघाताचे घंटा वाजत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरून असंख्य वाहने दररोज ये-जा करतात. त्याचबरोबर असंख्य नागरिकांची पायी पदयात्रा चालू असते. दुचाकी चार चाकी व सहा व दहा चाकी सुद्धा वाहने या रस्त्यावर जातात. जवळच भाजी मार्केट असल्यामुळे वाहनांची गर्दी सकाळपासूनच असते.
चौकात सिग्नल बंद पडल्यामुळे वाहनचालकांना कधी थांबायचे, कधी पुढे जायचे याचा अंदाज लागत नाही. कोणतेही नियम न पाळण्यास अपघाताची घंटा होऊ शकते. अद्याप हा सिग्नल कशामुळे बंद झाला आहे याचे कारण समोर आले नसून लवकरच सिग्नल चालू व्हावा अशी मागणी पनवेलकरांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments