Saturday, September 13, 2025
घरमहाराष्ट्रकाँग्रेसची दिशाभूल; सरकारचा विकासकामांवर ठाम विश्वास

काँग्रेसची दिशाभूल; सरकारचा विकासकामांवर ठाम विश्वास

प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर विरोधकांकडून होत असलेले आरोप निराधार असून, मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकार जनतेच्या हितासाठी आणि मुंबईकरांना चांगली सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पालिकेकडून सुरू असलेली पाणीपुरवठा व इतर पायाभूत सुविधा प्रकल्पे ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, आंतरराष्ट्रीय दर्जा राखून केली जात आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि आगामी २५ वर्षांचा विचार करून ही कामे राबवली जात आहेत. त्यात कुठलाही भ्रष्टाचार नाही, तर काटेकोर प्रक्रिया पाळूनच टेंडर दिले जात आहेत, असे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले.

काँग्रेस पक्षाने गेल्या अनेक वर्षांत मुंबईकरांच्या कराच्या पैशांवर जो कारभार केला तो जनतेला चांगलाच माहिती आहे. अनेक प्रकल्पे रखडवली आणि शहराच्या विकासात आत्तापर्यंत अडथळे आणले. आज जेव्हा महायुती सरकार आणि पालिका वेळेत काम पूर्ण करत आहेत, तेव्हा विरोधकांना हे पचत नाही व सहन होत नसल्याने बिनबुडाचे आरोप काँग्रेस करत आहे.

पाईपलाईन प्रकल्पाबाबत दिलेल्या माहितीतही तथ्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकारी म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येच्या मागण्या भागवण्यासाठी अतिरिक्त लाईनची आवश्यकता होती. खर्च वाढला तो महागाई, अतिरिक्त काम आणि दर्जेदार साहित्य वापरण्यामुळे. मुंबईकरांना अखंड व शुद्ध पाणीपुरवठा देणे ही आमची जबाबदारी असून त्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments