मुंबई : महिला व बालविकास विभागामार्फत समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे हक्क संरक्षित व्हावेत या उद्देशाने महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर आयोजित केला जातो.
मुंबई शहर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई शहर महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७, बी.बी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई येथे अर्ज करावा. असे मुंबई शहरच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.