Wednesday, September 10, 2025
घरमहाराष्ट्रएका दिवसात तब्बल २२७४ आयुष्मान कार्ड! ...

एका दिवसात तब्बल २२७४ आयुष्मान कार्ड! वाई पंचायत समितीची नियोजनबद्ध मोहीम ठरली यशस्वी

वाई(विजय जाधव) : ‘आरोग्य सुरक्षा हमी’ देणाऱ्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान भारत या उपक्रमांतर्गत वाई तालुक्यात बुधवार, दि. १० सप्टेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २,२७४ लाभार्थ्यांची आयुष्यमान कार्डे तयार करण्यात आली.आयुष्मान कार्ड हे सामान्य नागरिकांसाठी आरोग्य कवच ठरते. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्डे काढून तालुक्यातील नागरिकांना थेट आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळणार आहे, ही बाब समाधानकारक आहे. या यशस्वी उपक्रमाची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी दिली.

वाई पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपासून गावोगावी जाऊन आयुष्मान कार्डची माहिती दिली होती. त्याचाच परिणाम म्हणून नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या मोहिमेत आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ऑपरेटर आणि ग्रामपंचायत विभागातील सर्व कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून ही मोहीम यशस्वी केली असल्याचे
गटविकास अधिकारी परिट यांनी सर्व सहभागींचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments