मुंबई (भीमराव धूळप): राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच शिवसेना शिंदे गटाने मोठी खेळी करत “मिशन महापालिका”साठी धडाकेबाज तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात उतरण्यासाठी २१ प्रमुख नेत्यांची खास कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली असून आता पक्षाचा प्रत्येक निर्णय या समितीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
महायुती म्हणून एकजूट राखण्याचा नारा देत शिंदे गटाने निवडणुकीसाठी ताकदीने सज्जता केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी अजूनही रणनीतीत गुंतली असताना, शिंदे गटाने आपला डाव चोख मांडला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची आज झालेली बैठक देखील चर्चेचा विषय ठरली असली तरी मुंबईच्या राजकारणात शिंदे गटाने पुढाकार घेतला आहे.
हीच आहे शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती “रणशूरांची फौज”
1. एकनाथ शिंदे – मुख्य नेते, 2. रामदास कदम – नेते, 3. गजानन कीर्तीकर – नेते, 4. आनंदराव अडसूळ – नेते, 5. मीनाताई कांबळे – नेत्या,6. डॉ. श्रीकांत शिंदे – खासदार, 7. रवींद्र वायकर – खासदार, 8. मिलिंद देवरा – राज्यसभा खासदार, 9. राहुल शेवाळे – माजी खासदार, 10. संजय निरुपम – माजी खासदार, 11. प्रकाश सुर्वे – आमदार, 12. अशोक पाटील – आमदार, 13. मुरजी पटेल – आमदार, 14. दिलीप लांडे – आमदार, 15. तुकाराम काते – आमदार, 16. मंगेश कुडाळकर – आमदार, 17. श्रीमती मनिषा कायंदे – विधान परिषद, आमदार, 18. सदा सरवणकर – माजी आमदार, 19. यामिनी जाधव – माजी आमदार, 20. दीपक सावंत – माजी आमदार, 21. शिशिर शिंदे – माजी आमदार