Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकाँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची शिवसेनेच्या यादीवर नाराजी

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची शिवसेनेच्या यादीवर नाराजी

प्रतिनिधी : जेव्हा काही जागांवर चर्चा सुरू आहे आणि आपण आघाडीत आहोत, तेव्हा आघाडी धर्म पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

उद्धवजींनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांचा बाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे असे माझे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यामुळे काँग्रेसचे नेते आघाडी मध्ये नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची शिवसेनेच्या यादीवर नाराजी

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments