ताज्या बातम्या

अनुशक्ती नगरमध्ये गणेशोत्सव सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी : अनुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रात सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण संवर्धन, सामाजिक प्रबोधन आणि चालू घडामोडींवर आधारित सजावटीद्वारे गणेशभक्तांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी विभागाध्यक्ष रवींद्र शेलार आणि विभागाध्यक्षा अमिता गोरेगावकर यांनी पुढाकार घेतला असून, राज्य उपाध्यक्ष नवीन भाऊ आचार्य यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उपविभागाध्यक्ष सचिन ससाने, राजेश पुरभे, विशाल कदम यांच्यासह सर्व शाखाध्यक्ष आणि महाराष्ट्र सैनिक अथक परिश्रम घेत आहेत.

सदर स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले आणि मनःपूर्वक आभार मानले आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top