नेरळ(भास्कर तरे ) : ऐन उत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत व्हावी किंवा नियमित असावी अशी सर्व सामान्यांची माफक अपेक्षा असताना मध्य रेल्वेची मात्र सतत दोन दिवस खोळंबा गाडीचा खेळ सुरू आहे. नागरिकांना आॅफीसला वेळेत पोहचण्याची कसरत करावी लागत असतानाच गुरुवारीसुध्दा सकाेली जवळपास ४०-५० मिनिटे कर्जतकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत होत्या तर तोच किती आजही शुक्रवारी सकाळी सुरू राहिला. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान कर्जतकडे जाणा-या मार्गावर मालवाहू गाडीत काही तांत्रिक बिघाड झाल्याने यामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने नेरळ स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाला. सकाळी सहा वाजल्यापासून कर्जतकडे एकही लोकल ट्रेन धावली नाही. सकाळी ८ वाजता पहिली ट्रेन कर्जतच्या दिशेने रवाना झाली आणि तीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कडे
पुन्हा मुंबईकडे निघाली. या दरम्यान प्रवाशांनी गर्दी तसेच गैरसोयीला सामोरे जावे लागले.
यावेळी प्रवाशांनी कर्जतला जाऊन उलटा प्रवास करत आपला सीट पकडला आणि नियमित वेळेपेक्षा अधिकचा प्रवास केला. तसेच, मध्य रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत ऐन उत्सवाच्या काळात अधिक सेवा द्यायचा सोडून असलेली सेवाही नियमित नाही यावरून मध्य रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना कोणी वालीच नसल्याचे खंत व्यक्त केली जात होती