Thursday, August 21, 2025
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील वाहनाचे तंदुरुस्त चाचणी केंद्राची साताऱ्यात उभारणी...

महाराष्ट्रातील वाहनाचे तंदुरुस्त चाचणी केंद्राची साताऱ्यात उभारणी…

सातारा(अजित जगताप) : रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण हे वाहनाच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असते. त्यामुळे वाहनाची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्रात तीन ठिकाणी अद्ययावत वाहन तंदुरुस्त चाचणी केंद्र छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
या वाहन तंदुरुस्त चाचणी केंद्रात रिक्षा-टॅक्सींपासून खासगी गाडय़ांपर्यंत आणि बसपासून ते मोठय़ा ट्रकपर्यंत सर्वच गाडय़ांची चाचणी होणार आहे. सातारा येथील केंद्राच्या उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पुढील वर्षी या केंद्राचे उद्घाघाटन होऊन ते कार्यान्वित होणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.
रिक्षा-टॅक्सी यांप्रमाणेच सर्व सार्वजनिक वाहनांना दरवर्षी तंदुरुस्त चाचणीला सामोरे जावे लागते. आतापर्यंत सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात काही अंतर गाडी चालवून, त्या गाडीची कागदपत्रे तपासली जात होती. ही चाचणी घेतली जात होती. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या पाहून सातारा जिल्ह्यात कराड आणि फलटण या ठिकाणी वाहन नोंदणीचे परिवहन कार्यालयाचे उभारणी केली आहे. त्याचबरोबर अद्यावत तंत्रज्ञान आत्मसात करून सातारा परिवहन विभागाने ही चाचणी अचूक करण्यासाठी आता यंत्रांचा आधार घेतला आहे.
वाहनांच्या चाचणीसाठी यंत्रे उभारणीचे काम नाशिक, संभाजीनगर व आता साताऱ्यात सुरू झालेले आहे.
सातारच्या विकासामध्ये आणखीन महत्वपूर्ण बदल झालेला आहे. या केंद्रात ब्रेक चाचणी, चाकांची स्थिती, एक्झॉस्ट एमिशन, रिक्षा-टॅक्सी मीटर चाचणी आदी चाचण्या यंत्राद्वारे होतील. या चाचण्या घेण्यासाठी प्रशिक्षित चालक असणार आहेत. या सर्व चाचण्या पारदर्शक होणार आहे. यंत्राद्वारेच निकाल हाती मिळेल.
या यंत्राद्वारे एका गाडी तंदुरुस्त चाचणी होण्यासाठी किमान १५ ते कमाल २० मिनिटे एवढा कालावधी लागणार आहे. या केंद्रात लहान गाडय़ांपासून ते मोठय़ा ट्रकपर्यंत सर्व वाहनांची चाचणी होणार आहे. पुढील वर्षापर्यंत सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात हे केंद्र सुरू होणार आहे . सध्या या केंद्राच्या सांगाड्याचे काम परिवहन कार्यालयात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

____________________________

फोटो – सातारा परिवहन कार्यालयात अद्यावत तपासणी केंद्र उभारणी (छाया– अजित जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments