नवी मुंबई : गेमचेंज बीओएस या गेमचेंज एनर्जी टेक्नॉलॉजीजच्या विभागाने नवी मुंबई येथील तळोजा येथे आपल्या उच्च क्षमता मीडियम व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर उत्पादन सुविधेचे उदघाटन केले आहे. ही अद्ययावत सुविधा १८०,००० चौ. फुटांच्या परिसरात पसरलेली असून तिची क्षमता वार्षिक स्तरावर १८०० ट्रान्सफॉर्मर्सच्या निर्मितीची आहे. त्यातून कंपनीच्या भारत, युरोप आणि अमेरिकेतील महत्त्वाच्या बाजारपेठांना सेवा देण्याच्या क्षमतेचा विस्तार होणार आहे.या धोरणात्मक विस्तारामुळे गेमचेंज बीओएस ०.५-२५ एमव्हीए श्रेणीमध्ये आपल्या उत्पादनांची संख्या प्रमाण वाढवू शकते. त्यात ६९ केव्ही पर्यंत व्होल्टेज रेटिंग असेल आणि ते एआय-चलित डेटा सेंटर्स, अक्षय ऊर्जा प्रकल्प, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (बीईएसएस) आणि मोठ्या प्रमाणात विद्युतीकरणासाठी पायाभूत सुविधांसारख्या उच्च-वाढीच्या विभागांना सेवा देणार आहेत.“आम्ही जलद वितरण, उत्तम सेवा आणि अद्वितीय किंमतीसह ट्रान्सफॉर्मर क्षेत्रातील ग्राहकांच्या अनुभवात क्रांती घडवत आहोत,”असे गेमचेंज बीओएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू वर्डेन म्हणाले. ते पुढे म्हणाले कि, “आमचा नवीन कारखाना आम्हाला तातडीच्या बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करेल आणि जागतिक विद्युतीकरण चळवळीत एक महत्त्वाची कंपनी ठरवेल,भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांशी सुसंगत असलेली ही सुविधा देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणार असून
औद्योगिक विस्तार वाहतुकीचे विद्युतीकरण डेटा सेंटर आणि शहरी वापर वाढल्याने २०३५ पर्यंत भारताची विजेची मागणी तिपटीने वाढेल, असा अंदाज आहे.
मेक इन इंडियाच्या धर्तीवर नवी मुंबईत ट्रान्सफॉर्मर उत्पादन सुविधा; जागतिक विद्युतीकरण मागणीची पूर्तता होणार
RELATED ARTICLES