प्रतिनिधी : कराड तालुक्यातील घोगाव गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते व उत्तम आचारी म्हणून नावलौकिक असलेले अशोक भेदाटे यांची घोगाव ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
अशोक भेदाटे यांनी यापूर्वीही पत्नी सरपंच असताना गावच्या एका वर्षाच्या कार्यकाळात उत्कृष्ट समन्वय साधून विकासमय वातावरण राखले होते. त्यांच्या शांत, संयमी व समतोल नेतृत्वामुळे गावातील वाद-विवाद सोडवण्यात ते यशस्वी ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईपासून गावापर्यंत त्यांच्या निवडीबद्दल चर्चेची जोरदार दखल घेतली जात असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.