प्रतिनिधी : कराड तालुक्यातील मौजे घोगाव येथे सावली सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत गरजूंसाठी अंत्यविधीवेळी लागणारे लाकूड, कापड आदी साहित्य पुरवण्याचा उपक्रम सुरू असून, भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील हिंदू स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. स्मशानभूमीत कायमस्वरूपी टिकणारी झाडे लावण्यात आली. कार्यक्रमास डॉ. अरुण माने, शंकर पाटील (आबा), जयसिंग पाटील (आप्पा), चेअरमन . सुभाष पाटील,. रमेश शेवाळे, नारायण साळुंखे, बाजीराव तांबेकर, अशोक भेदाटे, रामचंद्र भावके, मुख्याध्यापक सूर्यवंशी सर, तलाठी मॅडम, संभाजी नांगरे, धनाजी पाटील, नेताजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
घोगाव येथे सावली सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे हिंदू स्मशानभूमीत वृक्षारोपण
RELATED ARTICLES