प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वाळणे गावातील तरुणांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वाळणे येथे शैक्षणिक उपक्रम २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य, टी-शर्ट, ट्रॅकसूट, जॅकेट तर अंगणवाडीतील बालकांना खेळणी वाटप करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे जिल्हा व तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धांतील यश व मनोबल वाढविणे, खेळाडू वृत्ती जोपासणे, सांघिक खेळाची गोडी निर्माण करणे आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणे हा उपक्रमाचा उद्देश होता.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, शिक्षक वर्ग, गावचे सरपंच, पोलिस पाटील, तसेच संदीप सावळाराम नलावडे, सचिन पांडुरंग नलावडे, अरुण दिलीप नलावडे, सचिन धोंडिबा नलावडे (बंटी), मनीष जाधव, गणेश वाळणेकर, प्रशांत चंद्रकांत नलावडे, प्रशांत शामराव तांबे, गणेश रामचंद्र सुतार, सनील नारायण नलावडे, स्वप्नील मारुती नलावडे, प्रकाश रामचंद्र मोरे, दिनेश लक्ष्मण नलावडे, पार्थ राजेंद्र नलावडे, प्रवीण आनंद मोरे, विलास शिवराम सुतार (पोलिस पाटील), चिमाजी लक्ष्मण तांबे, सुभाष लक्ष्मण सुतार, सचिन मारुती भोसले, संदीप नारायण सकपाळ, वसंत बबन पडगे, राजेंद्र गणपत नलावडे, विजय राजाराम सकपाळ, अमोल विठ्ठल सकपाळ, संतोष रामचंद्र सकपाळ, संजय मारुती नलावडे, संजय रामचंद्र मोरे, योगेश सावळाराम नलावडे, नवनाथ मधुकर सुतार, विनोद नारायण पवार, बाळकृष्ण पांडुरंग जाधव, संजय नामदेव भोसले, हुसेन भाई शेख (अध्यक्ष – कामगार सेना वरळी विभाग), ऋत्विक गोविंद नलावडे, रुपेश शांताराम वाळणेकर आदींचे सहकार्य लाभले.