नवी मुंबई – कुस्ती क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कराड तालुका कुस्ती संघटना अध्यक्ष श्री पैलवान तानाजी चवरे (आप्पा) यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५ ने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार नवी मुंबईतील घणसोली येथील महापालिकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक व राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे, विजय चोरमारे, विधानपरिषद आमदार विक्रम पाटील आणि भारत सरकारचे स्वतंत्र राज्यमंत्री दर्जाचे भरत नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती मैदानात अनेक पुरस्कारांनी श्री. चवरे (आप्पा) यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान त्यांच्यासाठी विशेष अभिमानाचा ठरला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी व यशवंत नीतीने प्रेरित होऊन ते कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आणि आयोजक यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत व त्यांच्या टीमचे आभार मानले.
श्री तानाजी चवरे (आप्पा) म्हणाले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या नावाने मिळत असलेला पुरस्कार याचा मला खूप अभिमान आहे. गेले २५ वर्षे कुस्ती क्षेत्रात मी सातत्याने काम करत आहे. मी २००० साली माझ्या गावी मॅटवरील कुस्ती स्पर्धा आयोजन केले होते. त्यानंतर ग्रामीण भागातील वाढी- वस्तीवर जाऊन यात्रा कमिटीला भेटून यात्रेतील फिरत्या मैदानाचे रूपांतर कुस्त्या जोडून जाहिराती वरती घेण्यास प्रवृत्त केले व अनेक गावातील मैदानी चांगली होत आहेत. त्या मैदानात कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची संकल्पना सुरू केली. तसेच २०१८ साली पासून माझ्या वाढदिवसानिमित्त १५ नोव्हेंबर या दिवशी माझ्या गावी भव्य कुस्ती मैदान घेण्यास सुरुवात केली कोरोना काळात ही सलग २ वर्षे कुस्ती मैदानी घेऊन कुस्ती जिवंत ठेवण्याचे काम व पैलवानांना पाठबळ देण्याचे काम माझ्या हातून घडले. इथून पुढेही पैलवानांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याचे काम करणे व तालुक्यात मॅटवरील स्पर्धा घेण्याचा संकल्प व सालाबाद प्रमाणे माझ्या वाढदिवसानिमित्त घेत असलेले मैदान सुरु ठेवणे तसेच कराड तालुक्यातील सुरु केलेला आदर्श पैलवान पुरस्कर, कायम स्वरूपी सुरु ठेवणे त्याच बरोबर पुढे जाऊन कराड तालुका कुस्ती संघ व कला क्रीडा सांस्कृतिक ट्रस्ट (रजि.) या संस्थेच्या माध्यमातून माध्यमातून आर्दश वस्ताद, आर्दश तालीम, त्याचबरोबर ज्या गावात यात्रे निम्मित यात्रा कमिटी चांगलं मैदान घेतात त्यांचाही त्या मैदानात जाऊन सन्मान करणे जे कुस्तीसाठी थोर देणगीदार देणगी देतात त्यांचाही सन्मान करणे, आदेश कुस्तीप्रेमी व कुस्तीवर प्रेम करणारे पत्रकार बंधू यांचा सन्मान करणे,भविष्यात उंडाळे सारख्या ग्रामीण भागात कुस्ती संकुलन उभे करणे व मुलांना प्रशिक्षणासाठी आखाडा व मॅट उपलब्ध करणे असे संकल्प करणारे असल्याचे सांगितले.
सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्यरत इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. नागरिकांची मोठी उपस्थिती या गौरवक्षणाला साक्षी राहिली.