पंढरपूर : पंढरपूर-म्हसवड रोडवर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय ओंकार रमेश खांडेकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नुकताच इंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेला ओंकार, १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांनी हौसेने घेतलेल्या यामाहा बाईकवरून पेट्रोल भरून येत असताना हा अपघात झाला.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या १२ चाकी सिमेंट ट्रकच्या चाकाखाली ओंकार गेला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ओंकारचे वडील मुंबईत रंगकामाचे काम करतात. दोन बहिणींमध्ये तो एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेने खांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.