प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अनेक शिलेदार, नेत्यांनी त्यांच्या भूमिका बदलवल्या. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकले. तर काहींनी वेगळी वाट चोखंदळली. गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधले. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे शिवसेनेत
RELATED ARTICLES