Monday, August 4, 2025
घरमहाराष्ट्रजावळीकरांनी एकदाच अजून संधी द्यावी : शशिकांत शिंदे

जावळीकरांनी एकदाच अजून संधी द्यावी : शशिकांत शिंदे

ेढा(अजित जगताप) : जावळी तालुक्याचा सुपुत्र असल्याचा मला अभिमान आहे गेली सोळा वर्ष सामान्य जनतेने प्रेम दिले आणि सत्कार सुद्धा केला त्यामुळे मी भारावून गेलो असून मला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी द्यावी असे भावनिक आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व जावळीचे सुपुत्र आमदार शशिकांत शिंदे यांनी केले मेढा येथील कलश मंगल कार्यालयात झालेल्या या ऐतिहासिक सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित पवार तसेच सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या हूमगावची कन्या कुमारी प्राजक्ता पवार यांचाही सत्कार करण्यात आला.
मेढा नगरीतून ढोल ताशाच्या व तुतारीच्या निनादांमध्ये आमदार शशिकांत शिंदे व आमदार रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. जावळी तालुक्यात प्रवेश करतात अनेक गावातील ग्रामस्थांनी दोन्ही आमदारांचा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि सर्वजण जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीत मिरवणुकीत सामील झाले होते. यावेळी मेढा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शंकरराव पवार , माजी आमदार सदाशिव सकपाळ, विठ्ठल गोळे, गोपाळ बेलोशे,प्रकाश भोसले, मनोज परामणे, समिंदरा जाधव, अर्चना देशमुख, मोहन शिंदे, राजकुमार पाटील, सुरेश पार्टे ,आनंदराव जुनघरे, यशवंत फरांदे ,योगेश गोळे, बापूराव पार्टे, जयवंत शिंदे, रूपाली भिसे, चंद्रकांत पवार, सुनील फरांदे, राजेंद्र शिंदे, रवींद्र परामणे , प्रकाश परामणे, नारायण शिंगटे गुरुजी, मोहन भिलारे, हणमंत पवार, चंद्रकांत गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
जावळी व महाबळेश्वर तालुक्याचे राजकीय दृष्ट्या वजन नव्हते. अशावेळी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या आशीर्वादाने संधी मिळाली आणि जावळी तालुका राष्ट्रवादीमध्ये करत असताना जिल्हा परिषदेमध्येही सभापती पद देण्यास भाग पाडले आपल्या सर्वांचाच आशीर्वाद लाभल्यामुळे जावळीकरांना ताकद मिळाली. मला विरोध करणार ना मी फारशी किंमत देत नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
जावळी तालुक्यातील मावळे नेहमीच विकास कामाकडे लक्ष देतात. त्यामुळे आगामी राजकीय वाटचाल करताना जावळीकरांनी गद्दारी करणार ना धडा शिकवावा असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. यावेळी मान्यवरांचे विचार ऐकण्यास मिळाले. या सत्कार समारंभाला मोठ्या संख्येने सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments