मुंबई(रमेश औताडे) : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे म्हणून ज्या भीमसैनिकांनी लढा दिला त्या भिमसैनिकांना पेंशन लागू करावी अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले.
नामांतराचे आंदोलन हे एका समाजाचे नव्हते ते लोकशाहीच्या हिताचे होते त्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी १६ वर्ष संघर्ष केला आणि लोकशाहीचा सन्मान राखला. तत्कालीन शासनाने स्वता हून पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या दोन्ही सदनात एक मताने ठराव पारित केला. तत्कालीन शासनाची अमंलबजावणीची जबाबदारी होती ती अंमलबजावणी न करता समाजाच्या माथ्यावर ठेवली आणि एक पिढी गारद केली.
तत्कालीन शासनाने दिलेल्या जखमांवर वर्तमान शासनाने आता मलम लावून आणीबाणीच्या धरतिवर त्या भिमसैनिकांना पेंशन लागू करून कार्यकर्त्यांचा सन्मान करावा. असे बागडे यांनी शहिद भिम सैनिकांना मानवंदना देत असताना मागणी केली.
यावेळी चंद्रमणी बांबुर्डे, इतिहासकार नामदेवराव निकोसे, दामु दादा कावरे, अनिल मेश्राम,पुर्थि गोटे, चरणदास गायकवाड उपस्थित होते
डॉ सुधा जंनबधु यांनी शहिद भिम सैनिक पोचिराम कांबळे यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. वैशाली तभाने, प्रा.रमेश दुपारे, शालिक बांगर,राजु कांबळे, मनोहर इंगोले, रमेश डहका, सुशिला जनबादे,रुबिना शेख सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते