प्रतिनिधी : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रामार्फत त्यांनी संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार तात्काळ राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले.धनखड यांनी पत्रात म्हटले आहे, “प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार मी हा निर्णय घेत आहे. या कार्यकाळात मला राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अमूल्य पाठिंबा लाभला, त्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.”राजकीय वर्तुळात या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू असून, पुढील उपराष्ट्रपतीपदासाठी संभाव्य नावांवर अटकळ बांधली जात आहे. जगदीप धनखड यांचा कार्यकाळ शांत आणि संविधाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखला गेला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून पावसाळी अधिवेशन सुरू होताच दिलेला राजीनामा धक्कादायक मानला जात आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, प्रकृतीच्या कारणास्तव पद सोडले
RELATED ARTICLES