कराड(विजया माने) – इस्लामपूर येथील सेतू कार्यालयातून विद्यार्थ्यांना वेळेवर सर्व प्रकारचे शासकीय दाखले मिळावेत, यासाठी आज अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांसाठी लागणारे जात, उत्पन्न, राहिवासी, नॉन क्रिमिलिअर यांसारखे महत्वाचे दाखले वेळेत मिळत नसल्याने त्यांच्या शिक्षणात अडथळे येत असल्याचे नमूद करण्यात आले.अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत योग्य त्या सूचना व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने प्रशासनाकडे विनंती करण्यात आली की, दाखले देण्याची प्रक्रिया जलद गतीने पार पडावी व विद्यार्थ्यांना विनाविलंब सेवा उपलब्ध करून द्यावी.
इस्लामपूर येथे नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे यांना दाखले वेळेवर मिळावेत यासाठी अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे निवेदन
RELATED ARTICLES