ताज्या बातम्या

शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. शिंदे यांच्या समर्थकांनी या निर्णयानंतर जोरदार जल्लोष केला.

नियुक्तीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, “माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल शरद पवार साहेब, सर्व वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पक्ष संघटना बळकट करून ती महाराष्ट्राच्या नसुदीपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. पक्षाला पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मी दिवस-रात्र मेहनत घेईन.”

मी सामान्य कुटुंबातून आलोय. आर.आर. पाटील यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवेन. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी लढेन,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते असून पक्षात त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटनेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top