प्रतिनिधी :
गुरुपौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त काळा किल्ला महानगर पालिकेच्या शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करत भाजपच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. वॉर्ड अध्यक्ष श्री. राजकुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.कार्यक्रमात शाळेतील सुमारे 60 शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंडल संयोजक श्री. उदय नांदे, श्री. शैलेंद्र सोनवणे, श्री. कनिकराम चौधरी, श्री. विनोद कांबळे, श्री. संतोष शर्मा, श्री. शामू मैत्रे, श्री. श्यामनाथ राय, श्री. अशोक चौगुले, श्री. राजेश जैसवार, श्री. तुषार माने, श्री. यशवंत पुजारी, श्री. शिव मंगल यादव, श्री. गणेश पाचारणे, श्रीमती पूनम सिंग, गुडिया जी, आरती कडू, जयप्रकाश जैस्वार, संतोष कुमार शर्मा आणि इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमात उदय नांदे, राजकुमार गुप्ता, विनोद कांबळे आणि संतोष शर्मा यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणांतून शिक्षकांच्या कार्याची प्रशंसा केली. या प्रसंगी उपस्थित शिक्षक भारावून गेले आणि त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.शाळेचे मुख्याध्यापक आणि इमारत प्रमुख भांगरे सर यांनी सर्व आयोजकांचे आणि उपस्थितांचे आभार मानत सांगितले की, “या कार्यक्रमामुळे शिक्षकांना एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे, आणि समाजात शिक्षकांचा सन्मान जपला जातो हे पाहून आम्ही खूप आनंदित आहोत.