ताज्या बातम्या

दलित पँथरचा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने १५ जुलैला साजरा होणार!

प्रतिनिधी : दलित पँथर या ऐतिहासिक चळवळीचा वर्धापन दिन यंदा एका आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. दलित युथ पँथरच्या वतीने मंगळवार, दि. १५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात “प्रश्न तुमचे, उत्तर ज. वि. पवारांचे” या अनोख्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मूळत: २९ मे रोजी चैत्यभूमी येथे होणारा वर्धापन दिन संभाव्य पावसामुळे पुढे ढकलण्यात आला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, दलित पँथरचे सहसंस्थापक, आंबेडकरी विचारवंत व इतिहासकार ज. वि. पवार यांच्या ८२व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

ज. वि. पवार हे केवळ दलित चळवळीतील एक ज्येष्ठ नेतेच नाहीत, तर आंबेडकर विचारधारेचे निष्ठावान साक्षीदार आहेत. त्यांनी आजवर साठ वर्षांहून अधिक काळ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या शब्दांनी लेखनास सुरुवात करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. ४० हून अधिक ग्रंथ, दोन कवितासंग्रह, पन्नासहून अधिक ग्रंथांना प्रस्तावना, शेकडो लेख, व्याख्याने, संशोधन, आणि दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशा विविध भूमिकांमधून त्यांनी कार्य केले आहे.

कार्यक्रमाचा विशेष आग्रह:

कोणताही विषय असो – ज. वि. पवार उत्तर देतील. कार्यक्रमासाठी कोणतेही शाल, हार, फुलगुच्छ आणू नयेत, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

संपर्क:

📞 7400002535 / 7208009284

आयोजक: निलेश मोहिते (अध्यक्ष, दलित युथ पँथर)

स्थान: राजर्षी शाहू महाराज सभागृह, तिसरा माळा, शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प.), मुंबई – ४०००२८.

सविनय जय भीम!

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top