प्रतिनिधी : पिण्यास पाणी नाही गुरांना चारा नाही
महाराष्ट्रातील अनेक गावात आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.शिवरी,पुरंदर पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाव मात्र पाण्याची प्रचंड टंचाई त्यामुळे येथील गावकार्याबरोबर शेतकरी वर्ग,ज्यांच्याकडे जनावरे आहेत,ते जास्त हवालदिल झाले आहेत. गावची गावे निर्जन झाली आहेत,कारण पिण्यास पाणी नाही.पाणवठ्यावर पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शिवरी हे गाव नेहमीच दुष्काळ ग्रस्त असते.गावची यात्रा आहे पण पाणी नसल्याने गावची यात्रा म्हणावी तशी भरवण्यात आली नाही.दुष्काळी परिस्थिती आहे.
मनुष्याला पाणी कुठंही मिळते,पण जनावरांचे काय.सध्या शिवरी गावात भारतीय जैन संघटना अर्थात BJS च्या माध्यमातून जनावरांसाठी चारा छावणी उभारण्यात आली आहे.३०० पेक्षा जास्त जनावरे यात आहेत संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी, पुणे यांनी तात्काळ पाहणी करून सर्वोत्तपरी मदत घोषित केली पाहिजे, अशी स्थानिक गावकऱ्यांची मागणी आहे.