तुळसण(प्रताप भणगे) : “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती…”
संत तुकाराम महाराजांच्या या पवित्र अभंगातून स्फूर्ती घेत निनाई देवी ग्रामविकास फाउंडेशन आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, तुळसण यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला.
गाव विहीर परिसरातील पूर्वी लावलेल्या बॉटल पाम वृक्षांचे नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणी सौंदर्य आणि छाया लाभाव्यात म्हणून अशोक वृक्षांची लागवड करण्यात आली. निसर्ग संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले.
या उपक्रमासाठी प्रकाश चिंतू वीर (आप्पा) यांनी ₹९,०००/- रोख मदत दिली, तर उर्वरित निधी निनाई देवी ग्रामविकास फाउंडेशनने उभारला.
कार्यक्रमावेळी निनाई देवी ग्रामविकास फाउंडेशनचे नितीन यादवफौजी, श्री. फारुक मुलानी, मोहसीन मुलानी, मंथन माने, अण्णासो वीर, अक्षय वीर, शरद वीर, हरी यादव, नाना वीर, किरण वीर, बबलू मोरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक शिवाजी वीर (राव नाना), यशवंत माने (बुवा), व प्रकाश चिंतू वीर (आप्पा) उपस्थित होते.
ग्रामस्थ, निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी तरुणांच्या मोठ्या सहभागामुळे उपक्रम यशस्वी ठरला.
सदर उपक्रम वृक्षमित्र अरविंद माने (सर) यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली पार पडला.
या वृक्षारोपण मोहिमेमुळे गावातील हरित पट्टा वाढणार असून, पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या “आपुला धर्म पाहावा अंतरीचा…” या उक्तीनुसार खऱ्या अर्थाने निसर्गधर्म व ग्रामधर्म जोपासण्याचे कार्य या उपक्रमातून घडले. ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन!