Thursday, September 11, 2025
घरमहाराष्ट्रसुहित जीवन ट्रस्टच्या विशेष शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावर टेबल टेनिस कोच म्हणून निवड...

सुहित जीवन ट्रस्टच्या विशेष शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावर टेबल टेनिस कोच म्हणून निवड…

प्रतिनिधी : सुहित जीवन ट्रस्ट संचालित सुमंगल बौद्धिक अक्षम मुलांची शाळा, पेण, रायगड या संस्थेतील शिक्षक श्री. अमोल काईनकर आणि सौ. प्रीती म्हात्रे यांची स्पेशल ऑलिंपिक गेम्स मध्ये टेबल टेनिस

या खेळासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नॅशनल कोच म्हणून निवड करण्यात आली आहे ही अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे. बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्साहाने व आत्मियतेने कार्य करणाऱ्या या दोन्ही शिक्षकांची राष्ट्रीय कोच म्हणून निवड होणे ही केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या निवडीसाठी त्यांना संस्थेच्या संस्थापिका तथा प्राचार्या, सर्व विश्वस्त मंडळ, विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच समाजाच्या विविध स्तरातील लोकांकडून दोन्ही गुणवंत शिक्षकांना मन:पूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments