नवी मुंबई : नागरी संरक्षण दल, नवी मुंबई समूह (ठाणे) यांच्या वतीने कोपरखैरणे येथे आज आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन कोपरखैरणे विभागाचे क्षेत्ररक्षकअरुण सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वयंसेवक रमेश संकपाळ यांच्या समन्वयातून करण्यात आले.या उपक्रमास ठाणे उपनियंत्रक विजय जाधव साहेब यांच्या आदेशानुसार दिशा मिळाली. शारदा विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिरात १५ प्रशिक्षित स्वयंसेवकांनी विविध आपत्ती काळातील बचाव उपाय, प्राथमिक उपचार, अग्निशमन पद्धती यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले.कार्यक्रमाला सुमारे ३०० नागरिक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थित राहून सहभाग दर्शविला. उपस्थितांनी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत अशा प्रशिक्षणाची नियमित गरज असल्याचे मत व्यक्त केले.हा उपक्रम जनजागृती व कृतीशील प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत यशस्वी ठरला.
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES