Saturday, July 5, 2025
घरमहाराष्ट्रधारावी पुनर्विकासात मोठा निर्णय: वरील मजल्यांवरील झोपड्यांना पुनर्वसनाची पात्रता; प्रारूप यादी जाहीर

धारावी पुनर्विकासात मोठा निर्णय: वरील मजल्यांवरील झोपड्यांना पुनर्वसनाची पात्रता; प्रारूप यादी जाहीर

प्रतिनिधी : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत झोपडीधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यतः झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये अपात्र ठरणाऱ्या वरील मजल्यांवरील घरांनाही या प्रकल्पात पुनर्वसनाची पात्रता मिळणार आहे. यामुळे राज्य सरकार आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वसमावेशक धोरणाची दिशा स्पष्ट झाल्याचे चित्र आहे.

धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (डीआरपी) अधिकृत वेबसाइटवर परिशिष्ट-II चे प्रारूप प्रकाशित करण्यात आले आहे. यामध्ये सेक्टर 6 मधील मेघवाडी आणि गणेशनगर या भागांतील 505 घरांचे सर्वेक्षण झाले असून, त्यापैकी 229 घरे पात्र ठरली आहेत.

पात्रतेचे वर्गीकरण:

  • 101 घरांना धारावीतच विनामूल्य पुनर्वसन
  • 56 घरांना ₹40,000 हस्तांतरण शुल्क भरल्यानंतर पुनर्वसनाची पात्रता
  • 13 घरांना (2000–2011 बांधकाम) ₹2.5 लाख शुल्कासह धारावीबाहेरील अनुदानित गृहनिर्माणाचा पर्याय
  • 59 घरांना परवडणाऱ्या भाडे गृहनिर्माण योजनेत स्थान, यामध्ये 15 नोव्हेंबर 2022 पूर्वीच्या वरील मजल्यांवरील आणि 2011–2022 दरम्यानच्या तळमजल्यावरील घरांचा समावेश आहे.

वरील मजल्यांवरील घरांचा समावेश हा या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा बदल मानला जात आहे. यामुळे अनेक वर्षांपासून अनिश्चिततेत असलेल्या झोपडीधारकांना आता दिलासा मिळणार आहे. हे धोरण फक्त आकडेवारीचा नव्हे तर सामाजिक न्यायाचा मुद्दा ठरत आहे.

पुनरावलोकन आणि सूचना सादरीकरण:

प्रकल्पात समाविष्ट न झालेली 238 घरे व 38 सुविधा संरचना अजूनही पुनरावलोकनाखाली आहेत. सार्वजनिक शौचालये, मीटर रूम्स, बीएमसीच्या स्टोअर रूम्स यांचा यात समावेश आहे.

डीआरपीने झोपडीधारकांना आवाहन केले आहे की, 5 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आपली सूचना व हरकती प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे (dcca1drpsra@gmail.com) पाठवाव्यात.

अधिक माहितीसाठी संपर्क: डीआरपी / एसआरए सक्षम प्राधिकरण,दुसरा मजला, गाला अल्टीझा, शणमुखानंद हॉल शेजारी, किंग्ज सर्कल, सायन, मुंबई – 400022 येथे संपर्क करावा असे कळवले आहे.

धारावीचे ‘अदानीनगर’ करण्याचा डाव : आदित्य ठाकरे

आज धारावी पुनर्विकासासंदर्भात जाहीर झालेल्या पहिल्या यादीत ५०५ झोपडीधारकांपैकी केवळ १०१ झोपडीधारकांना पात्र ठरवलं गेलंय! म्हणजेच जवळपास ७५% रहिवाशी अपात्र ठरलेयत ! आम्ही सुरवातीपासून हाच प्रश्न विचारतोय, की अदानी समूह नेमका कुणाचा विकास करतंय? धारावीकरांचा की स्वतःचा? कदाचित मुंबईचं नाव ‘अदानीनगर’ करण्याचा भाजपचा विचार आहे!

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments