ताज्या बातम्या

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

प्रतिनिधी – 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन अर्ज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले.तर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 09 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.

आज दाखल केलेल्या अर्जामध्ये सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे उमेदवार सुभाषचंद्र झा, भारतीय राजनीतीक विकल्प पक्षाचे उमेदवार सुरेंद्रकुमार के जैन, आधार समाज पार्टीच्या उमेदवार अर्चना दिनकर गायकवाड, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार राहूल जगदीशसिंघ मेहरोलिया, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार चंद्रकांत विठ्ठल सोनावणे , डॉ पियूष के. सक्सेना यांनी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top