ताज्या बातम्या

भारतीय रडारने F-35B ला “लॉक” केल्याची चर्चा: अमेरिकेचे अत्याधुनिक लढाऊ विमान चार दिवसांपासून भारतात तळ ठोकून

प्रतिनिधी : अमेरिकेचे अत्याधुनिक स्टील्थ फायटर जेट F-35B गेल्या चार दिवसांपासून भारतात तैनात असून, यामागचं कारण कोणत्याही औपचारिक कार्यक्रमासाठी नाही, तर एक तांत्रिक पेच असल्याची माहिती समोर येत आहे. रॉयल नेव्हीच्या वापरात असलेलं हे मेड-इन-अमेरिका विमान सुरुवातीला “इंधन संपल्यामुळे” भारतात उतरल्याचं सांगितलं गेलं, नंतर “हायड्रॉलिक सिस्टिम बिघडली” असं म्हटलं गेलं. मात्र आता अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरी गोष्ट काहीशी वेगळीच आहे.

भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने या F-35B विमानाला भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करताना त्वरित “ट्रॅक आणि लॉक” केलं. हे लॉक इतकं अचूक आणि प्रभावी ठरलं की पायलटने त्याला बायपास करता आलं नाही, इतकंच नव्हे तर अमेरिकन आणि ब्रिटिश अभियंते देखील गेल्या अनेक दिवसांपासून ते अनलॉक करण्यात अपयशी ठरले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक पथके सतत प्रयत्न करत आहेत – सॉफ्टवेअर अपडेट्स, कोड इनपुट्स, तांत्रिक स्कॅनिंग… पण F-35B अजूनही उड्डाण घेण्याच्या स्थितीत आलेलं नाही.

F-35B हे अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचं आणि तांत्रिक प्रावीण्याचं एक प्रतीक मानलं जातं. हे विमान जगातील सर्वात प्रगत, पाचव्या पिढीतील स्टील्थ फायटर म्हणून ओळखलं जातं. परंतु भारतात आल्यानंतर हे विमान आजवर उडू शकलेलं नाही, आणि हे वास्तव अमेरिकेच्या लष्करी प्रतिष्ठेसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे भारताने कोणतेही इंटरसेप्टर क्षेपणास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक जॅमिंग वापरलेले नाही. केवळ रडारवरून विमान “लॉक” केलं आणि त्यानंतर ते निष्क्रिय झालं – हा प्रकार जागतिक पातळीवर भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेच्या बळकटीचा संकेत मानला जात आहे.

या घटनेने आंतरराष्ट्रीय लष्करी आणि राजनैतिक वर्तुळात चर्चा सुरु झाली असून, भारत आता केवळ एक उदयोन्मुख राष्ट्र राहिलेला नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होत जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

(सौजन्य: प्रकाश वखारे)

टीप: वरील बातमी सध्या सोशल मीडियावर आणि काही खासगी स्त्रोतांकडून शेअर केली जात आहे. अधिकृत लष्करी अथवा सरकारी खात्याकडून यासंबंधी अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top