ताज्या बातम्या

कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड,मोहन कदम राज्यस्तरीय”कोकण दीप पुरस्कार-२०२५ ने सन्मानित

मुंबई(शांताराम गुडेकर) : कोकणदीप मासिकाचा २३ वा वर्धापन दिन मुबंई मराठी ग्रंथ संग्रालय दादर येथे मा.ना.श्री योगेशदादा कदम(राज्यमंत्री गृह (शहरे)यांच्या उपस्थितीत मोठया थाटामाटात संपन्न झाला.यावेळी सामाजिक शैक्षणिक,साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कोकणदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मंचावर श्री.सुधीरभाऊ कदम(शिवसेना संपर्क प्रमुख -दापोली विधानसभा),डॉ.सुकृत खांडेकर(जेष्ठ पत्रकार,संपादक दैनिक प्रहार),श्री संतोष परब (महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त),डॉ.राम मेस्त्री (साहित्यिक),श्री.प्रवीण घाग(गिरणी कामगार नेते),श्री रणजित जाधव,विनय शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम यांना मा.ना.श्री योगेशदादा कदम(राज्यमंत्री गृह (शहरे)यांच्या शुभ हस्ते सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून मोहन जयराम कदम जमेल तशी जनसेवा करत आहेत.गावांमध्ये विकासात्मक गोष्टींना चालना देणे,आजारी व्यक्तीला उपचारासाठी योग्य मार्ग दाखवणे , विद्यार्थी वर्गाला मदत करणे आदी कामात सदैव तप्तर असलेले कदम, राजेंद्र भुवड यांना राज्यस्तरीय “कोकण दीप पुरस्कार-२०२५ देऊन गौरव झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना यानिमित्ताने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याधर शेडगे,सागर शेडगे,संदीप शेडगे, नितीन सुकदरे, निशांत शेडगे यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रसाद महाडिक यांनी केले.तर आभार प्रदर्शन संपादक श्री.दिलीप शेडगे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top