Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रबळ नसताना स्वबळाचा खेळ बंद करावा - नारायण बागडे

बळ नसताना स्वबळाचा खेळ बंद करावा – नारायण बागडे

मुंबई(रमेश औताडे) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बळ नसताना स्वबळाचा लपंडाव जो खेळ रिपाइं मधील काही नेत्यांनी सुरू केला आहे तो बंद करावा असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्वराज्य संस्था निवडणुकीचा खरा हक्कदार हा चळवळीचा कार्यकर्त्यां आहे. त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे समाजाचे आणि नेत्यांचे कर्तव्य आहे. मात्र काही नेते आपल्या सोईचे राजकारण कसे करता येईल यात रमले आहेत. रिपब्लिकन गटातील काही नेत्यांच्या खेळात खरा कार्यकर्ता मागे राहिला आहे. या पार्श्वभूमीवर २६ जुन रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ता मनपा भेजो अभियान कोल्हापूर येथून प्रारंभ होणार आहे.

आंबेडकरी समाजातील मतदानाचे विभाजन करून दुसरे पक्ष मजबूत करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या पदरात आपल्या समाजाची मते पाडून घेण्यासाठी पुरोगामी असो कि प्रतिगामी असणाऱ्या पक्षासोबत हात मिळवणी करून राजकीय वाटा किती मिळेल याचा विचार करावा. तीच खरी पावती आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे हेच नेत्यांचे कर्तव्य आहे असे मत बागडे यांनी यावेळी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments