ताज्या बातम्या

मराठवाडा-विदर्भाला जोडणारा सी लिंक स्टाईल पूल

प्रतिनीधी : फोटोत दिसणारा भव्य पूल पाहून प्रथमदर्शनी आपणास वाटेल की हा मुंबई किंवा ठाण्यातीलच असावा. कारण अशी भव्य कामे सहसा मुंबईत किंवा मोठ्या शहरांमध्येच होताना आपण पाहिली आहेत. आपल्याला मुंबईच्या प्रसिद्ध सी लिंकची सवय आहे. त्यामुळे असं वाटणं साहजिकच आहे.

पण खरं सांगायचं तर, हा पूल मुंबईचा नाही… ठाण्याचाही नाही… तर हा आहे मराठवाड्यातील!

हो, आश्चर्य वाटलं ना? हा पूल आहे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प. जिंतूर ते सेनगाव या मार्गावर येलदरी धरणाच्या गेटखालील जुना पूल अरुंद असल्याने नव्याने डी-लिंक पद्धतीने या भव्य पुलाची उभारणी केली जात आहे.

विशेष म्हणजे, मुंबईच्या सी लिंक नंतर देशात अशा प्रकारचा दुसरा पूल मराठवाड्यात उभा राहत आहे.

या पुलाची वैशिष्ट्ये:

लांबी: 370 मीटर

खर्च: सुमारे 900 कोटी रुपये

फायदा: दोन विभाग (मराठवाडा आणि विदर्भ) आणि दोन जिल्हे एकमेकांना जोडले जाणार, वाहतूक अधिक सोयीची आणि सुरक्षित होणार.

अशा भव्य प्रकल्पांची गरज मराठवाड्याला आहेच आणि या प्रकल्पांमुळे मागासलेला ठपका काढण्यास मदत होईल. आपण या विकासाच्या दिशेने होणाऱ्या पावलांचं स्वागत जरूर करायला हवं!

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top