प्रतिनिधी : सिल्लोड तालुक्यातील सारोळा गै. गावात आज सकाळी काळजाला हादरवणारी घटना घडली. आईसोबत शेतात पेरणी करत असताना अचानक विज कोसळून दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे तरुण आपल्या आईसोबत शेतीमध्ये काम करत होते. अचानक आकाशात ढग दाटले आणि काही क्षणातच जोरदार विजेचा कडकडाट झाला. दुर्दैवाने ही वीज थेट त्यांच्यावर कोसळली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण अपघातामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांसह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दु:खद प्रसंगात कुटुंबाला सावरण्याची ईश्वर शक्ती लाभो, हीच प्रार्थना.