ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त इंजिनिअर संतोष त्रिवेदी यांचे निधन ; ७८ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंता (इंजिनिअर) संतोष पन्नालाल त्रिवेदी उर्फ किशोरभाई त्रिवेदी यांचे काल सायंकाळी मालाड येथील त्यांचे चिरंजीव आनंद यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात अतुल आणि उमेश हे दोन लहान भाऊ, भाविनी आणि उर्वशी या दोन वहिनी, अनंत आणि आनंद ही दोन मुले, तृप्ती ही मुलगी, पलक आणि शालू या दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत मुंबई महापालिका मुख्यालय, बोरीवली, मालाड येथील कार्यालयात चांगली कामगिरी केली. आज सकाळी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ असलेल्या शिवधाम हिंदू स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनीत कै. संतोष त्रिवेदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी ज्येष्ठ चिरंजीव अनंत सर्व विधी यथासांग पार पाडले याने यावेळी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top