कराड (विजया माने) : 5 जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिवस म्हणून पाळला जातो. याचेच औचित्य साधून. आनी मोदी सरकारच्या कार्यकररणीला अकरा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मानेगाव व साईकडे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
ज्या पर्यावरणाच्या कुशीत आपण लहानाचे मोठे झालो खेळलो बागडलो या पर्यावरणाचे आपण काहीतरी देणे लागतो व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. व त्या वृक्षांना जगवणे ही देखील आपली जबाबदारी आहे. व ती आपण नक्की पार पाडू असे प्रतिपादन पाटण तालुका अध्यक्ष गणेश नाथाराम यादव यांनी केले.
दिनांक 5 जून 2025 गुरुवार
भारतीय जनता पार्टी पाटण तालुका यांच्या वतीने व तसेच माननीय आमदार अतुल बाबा भोसले सातारा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुकाध्यक्ष गणेश नाथाराम यादव, मा. जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा महेश ठीक,ओबीसी तालुकाध्यक्ष शेखर लोखंडे, किसान मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत मोडक, शिक्षक आघाडी अध्यक्ष संतोष देसाई, वाहतूक आघाडी अध्यक्ष जयवंत पवार, तालुका सरचिटणीस संतोष माने, युवा नेते दीपक मुळगावकर, मानेगाव चे ज्येष्ठ नेते भगवानराव माने. तसेच मानेगाव चे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व साईकडे गावचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज मानेगाव व साईकडे या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.