ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

नवी मुंबईत प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळा; ६ जूनला वाशी येथे आयोजन

प्रतिनिधी : नवी मुंबईत प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ६ जून २०२५ रोजी वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात प्रख्यात साहित्यिक आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे बीज भाषण, तसेच पद्मश्री अच्युत पालव, अर्जुन पुरस्कार विजेती अभिलाषा म्हात्रे, उद्योजक प्रकाश बाविस्कर आणि सुप्रसिद्ध कलावंत अशोक हांडे यांचा लोकनेते,राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी शाहीर रुपचंद चव्हाण यांचा “शाहिरी बाणा महाराष्ट्राचा” हा विशेष शाहिरी कार्यक्रमही होणार आहे.

हा सोहळा शिव तुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवव्याख्याते प्रा. रवींद्र पाटील (कोपरखैरणे) यांच्या नेतृत्वाखाली आणि विविध मंडळांच्या सहभागातून आयोजित करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Scroll to Top