मुंबई (शांताराम गुडेकर) : लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे, लांजा पंचायत समितीचे माजी उपसभापती व संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुभाष रामाणे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.अमोल मिस्त्री संस्थेचे सदस्य श्री महादेव पाटील यांच्या प्रयत्नाने उच्च न्यायालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी सौ.समिधा शाम पाटील मॅडम यांच्याकडून रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समिती यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.यावेळी रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीचे प्रमुख जिल्हाध्यक्ष श्री. आनंद त्रिपाठी,तालुका अध्यक्ष श्री.संजय सुर्वे उपाध्यक्ष श्री.दीपक बाईंग,सचिव श्री.मयूर जाधव आदी मान्यवर व दिव्यांग सभासद उपस्थित होते.
गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत
RELATED ARTICLES