ताज्या बातम्या
मुंबईच्या ‘संगम प्रतिष्ठान’च्या स्वच्छता कार्याचा म्हैसूरमध्ये गौरव! म्हैसूर महानगरपालिका आयुक्तांसह प्रशासनाकडून कौतुक; धारावीतील ड्राय वेस्ट सेंटरला भेट देण्याची कोकाकोलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्वाहीयेळगाव-गोटेवाडी जलसंधारण तलावातील मोटारी बंद;पाणीसाठा मर्यादित; पुढील सहा ते सात महिने पाणी जपून वापरण्याचे आव्हानकराड बसस्थानकात पाण्याचा अपव्यय! एकीकडे पाणीटंचाईचे सावट, दुसरीकडे पाणी वाया जात असल्याचे चित्रउंडाळे परिसरात पाणीटंचाईचे सावट; जलसाठा जपण्याची गरज_एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर पुन्हा केंद्र सरकारची भेट घेणार,उपसभापती सचिन अहिर यांची कामगार मेळाव्यात ‌ग्वाही!

वारकरी पंचावर साकारली संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा

तळमावले/वार्ताहर
‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’, असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदेह वैकुंठागमन केलं तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो. तुकाराम बीजेनिमित्त वारकरी परिधान करत असलेल्या पंचावर संत तुकारामांचे अप्रतिम आणि देखणे चित्र साकारत त्यांना नमन केले आहे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डाॅ.संदीप डाकवे यांनी. गळयात तुळशीची माळ, कपाळावर वारकरी टिळा, डोक्यावर पगडी किंवा टोपी, गळयात पंचा, धोतर, टाळ, मृदूंग आणि विणा असा काहीसा वारकऱ्याचा वेश असतो. या वेषभूशेतील पंचावर डाॅ.डाकवे यांनी तुकाराम महाराजांचे चित्र साकारले आहे.
यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी मोरपिसावर संत तुकाराम, अभंग चित्र वारी, एका पानावर हरिपाठ, टी शर्टवर विठोबा, पोस्टरमधून वारकऱ्याना शुभेच्छा, घराच्या भिंतीवर वारीचे चित्र, शब्दांतून विठ्ठल, अक्षर चित्र वारी, न अनुभवलेली वारी हस्तलिखित असे विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत.
पंढरपूरचे विठू माऊली हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्गुरु’ म्हणून ओळखतात. तुकाराम बीजच्या दिवशी तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसमंत भरून निघतो संत तुकाराम महाराजांनी अभंग रचले आणि यातून जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला.

Scroll to Top