Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रमानखुर्द स्टेशनजवळ सायन-पनवेल रोडवरील अतिक्रमणांवर मनपाची धडक कारवाई!

मानखुर्द स्टेशनजवळ सायन-पनवेल रोडवरील अतिक्रमणांवर मनपाची धडक कारवाई!

मानखुर्द(प्रदीप धुळप) : मानखुर्द रेल्वे स्टेशन परिसरालगतच्या सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या अनधिकृत घरे व दुकानांवर मुंबई महानगर पालिकेने मोठी कारवाई केली. ‘एम’ वॉर्ड अंतर्गत राबवलेल्या या मोहीमेमुळे सुमारे ५० हून अधिक अतिक्रमण हटवण्यात आली आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून या भागातील अतिक्रमणांबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. याची दखल घेत मनपाने आज सकाळी पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई केली. पत्र्याची घरे, अनधिकृत स्टॉल्स, दुकानांचे टेम्पररी शेड्स जमीनदोस्त करण्यात आले.

अतिक्रमण हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनपा कर्मचारी, जेसीबी यंत्रणा आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांततेत ही मोहीम पार पडली.

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सार्वजनिक रस्त्यांवर आणि महामार्गालगत अशा अतिक्रमणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. ही कारवाई भविष्यातील अनुशासन टिकवण्यासाठी आवश्यक होती.”

या मोहिमेमुळे परिसरातील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा प्रकारची कारवाई नियमितपणे व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments