Thursday, August 21, 2025
घरमहाराष्ट्रजागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी परिषद

जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी परिषद

मुंबई : जागतिक हवामान बदलामुळे कृषी फलोत्पादनावर होणारा विपरित परिणाम, देशांतर्गत व देशाबाहेर सेंद्रिय व चांगल्या प्रतिचा आंबा, भाजीपाला सर्व प्रकारचे फलोत्पादनाला असलेली मोठी मागणी विचारात घेता या प्रकारच्या उत्पादनावर भर देणे, नारळ सुपारी वरील किड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना, उत्पादक ते ग्राहक अशी बाजारपेठ उपलब्ध करणे यासाठी कृषी फलोत्पादन परिषदेचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.

२५ मे रोजी सकाळी गणेश मंगल कार्यालय हॉल सहाण बायपास अलिबाग, जिल्हा रायगड येथे कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, बियाणे, सौरउर्जा, दुग्धविकास परिषदेचे आयोजन केले आहे.देशाच्या बाजारपेठेत नव्याने पदार्पण झालेले व कृषी क्षेत्रासाठी प्रभावी ठरणारे इलेक्ट्रीक ट्रॅक्टर पहावयास मिळणार आहे. भविष्यातील शेती फायदेशिर ठरण्यासाठी ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची गरज ओळखून फवारणीसाठी ड्रोनच्या वापरावर भर देण्यात येत आहे. यासाठी ड्रोनसहित ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती उपस्थिताना देण्यात येणार आहे.

तसेच शबरी बॅन्ड अंतर्गत आदिवासी बांधवाची प्रिमियम उत्पादने विशेषतः ऑरगॅनिक व अन्य उत्पादने असलेले स्टॉल तसेच वेळेवर आंब्यांची मोहोर प्रक्रिया होण्यासाठी व उत्पादन वृध्दिसाठी आवश्यक कृषी औषधांचे स्टॉल प्रदर्शनात असणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून आगावू नोंदणीसाठी ९९२०१८४६६६, ९५९८८८४६६६ या दुरध्वनिवर संपर्क करावा.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments