सिरसाळा (प्रतिनिधी) : कोणत्याही महापुरुषाची अगदी भगवान श्री रामचंद्र प्रभूची ही जयंती हल्ली डीजेच्या कर्कशश दणदणाट साजरी होऊ लागलेली आहे. याचे अनेक दुष्परिणाम समाजात दिसत आहेत. जयंती उत्सवाला लागत असलेल्या या वाईट वळणाला बगल देऊन टाळ मृदंगाच्या गजरात कीर्तन महोत्सव आणि प्रबोधनात्मक व्याख्याने याच्या माध्यमातून अनोखा अहिल्यादेवी जयंती उत्सव शिरसाळा पंचक्रोशीतील सर्व गावांनी एकत्र येऊन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती हरिभक्त परायण शामसुंदर महाराज सुंदर यांनी दिली.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा हा 300 वा जयंती महोत्सव आहे याचे औचित्य साधून शिरसाळा परिसरातील सर्व गावांनी एकत्र येऊन कीर्तन भजनाच्या माध्यमातून हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिरसाळा येथील रेणुका माता मंदिरात बुधवार, दि. 21 मे ते रविवार दि. 25 मे दरम्यान हा कीर्तन महोत्सव होणारा असून यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध विवेकी कीर्तनकार ज्ञानदान करणार आहेत ज्यात प्रसिद्ध लेखक विचारवंत, फडकरी ज्ञानेश्वर महाराज बंडगर, प्रसिद्ध विचारवंत, लेखक, प्रकाशक डॉ. बालाजी महाराज जाधव, वारकरी संप्रदायातील अत्यंत पूजनीय व्यक्तिमत्व विनायक महाराज काचगुंडे तसेच शिरसाळा पंचक्रोशीतील अत्यंत प्रसिद्ध असणारे आणि सर्वात आदरस्थान असलेले नारायण बाबा संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण गुरुवर्य एकनाथ महाराज माने यांची कीर्तने होणार आहेत तर शामसुंदर महाराज सोन्नर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. कीर्तनाबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक व्याख्यानाचा कार्यक्रम आहे आयोजित करण्यात आला आहे
गोविंद महाराज धोत्रे, बलभीम माथेले, बाळासाहेब सोनसळे यांची व्याख्याने होणार आहेत. या सोहळ्याच्या उद्घाटनासाठी अध्यक्ष म्हणून बीड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण समितीचे सभापती प्रभाकर वाघमोडे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेतेअमर हबीब, शेतकरी नेते अजय बुरांडे, डॉ. राजाराम मुंडे, डाॅ. हरिश्चंद्र वंगे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच परळी, माजलगाव तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ही उपस्थित राहणार आहेत. परळी, माजलगाव तालुक्यातील आणि शिरसाळा पंचक्रोशीतील अहिल्याबाई विचार वारसांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शामसुंदर महाराज सुंदर यांनी केले आहे.
टाळ – मृदंगाच्या गजरात शिरसाळा येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती
RELATED ARTICLES