सातारा : जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा.. असे वातावरण जगभर पसरले आहे. भौतिक भौतिक सुविधा खरे सुख देऊ शकत नाही. तर मानवतावादी दृष्टिकोनच सर्व मानव जातीला एकत्र ठेवू शकतो. याची शिकवण देणारा भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगभर जयंती साजरी होत आहे. शिवथर ता. सातारा या ठिकाणी माता भगिनी व बंधूनीही मोठ्या उत्साहात भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करून बौद्ध पद्धतीने त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
गौतम बुद्ध जयंती निमित्त संपूर्ण सातारा जिल्ह्यात बुद्धम्. शरणम्.. गच्छामि.. तसेच समता स्वातंत्र्य बंधुत्व
नारा देण्यात आला. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात आली. युगपुरुषांच्या जयजयकारासोबतच भगवान गौतम बुद्ध जय हो चा नारा देण्यात आला. शिवथर या ठिकाणी बुद्ध विहाराची स्थापना झाली आहे.
त्याचबरोबर राष्ट्रवादी नेते संजय कांबळे, मा. सरपंच संजय बाबुराव कांबळे, सचिन कांबळे, राजेंद्र कांबळे यांच्या सौजन्याने बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. बौद्ध धम्माच्या आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बुद्ध जयंती साजरी होताना सर्वधर्मसमभाव पाळला जात आहे.
या ठिकाणी शासकीय वर्ग एकचे सेवानिवृत्त अधिकारी विलासराव साबळे व ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी आवर्जून भेट देऊन भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवथर बौद्ध समाजाचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे,शंकर कांबळे, वरूण कांबळे, बाळू कांबळे, ज्योती कांबळे,छाया कांबळे,अंकिता कांबळे कृष्णा कांबळे,गुड्डी कांबळे आधी स्थानिक बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर ठिकाणी बौद्ध विहार, शेड, सभागृह, वाचनालय,ग़ंथालय असे भव्य स्वरूपात सुविधा निर्माण केली आहे. आ. शशिकांत शिंदे यांचे निधीतून व किरण (नाना) साबळे तसेच सरपंच,उपसरपंच ग़ामपंचायत यांचे प्रयत्नातून शिवथर गावातही विकास कामे झालेले आहेत. यासाठी ग़ामपंचायत सदस्य संतोष साबळे, संजय कांबळे, गोरख कांबळे यांचीही मोलाचे योगदान लाभले आहे. दरम्यान शिवथर सरपंच प्रिया नितीन साबळे, उपसरपंच दत्तात्रय साबळे व सदस्यांनीही गौतम बुद्ध जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
_____________________________
फोटो — शिवथर येथे बुद्ध विहारात बुद्ध जयंती निमित्त शुभेच्छा देताना विलासराव साबळे व अजित जगताप आणि बौद्ध बांधव