Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रनिसर्ग संस्कार शिबिर कराड येथे उत्साहात संपन्न

निसर्ग संस्कार शिबिर कराड येथे उत्साहात संपन्न

कराड (विजया माने) – एन्व्हायरो फ्रेंड नेचर क्लब आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ग्रुप, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले निसर्ग संस्कार शिबिर तीन व चार मे 2025 रोजी वाखण रोड येथील निसर्ग सावली या ठिकाणी उत्साहात पार पडले.

या शिबिरात निसर्ग, पर्यावरण व जैवविविधतेवर आधारित विविध विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. श्री. द.जो. पवार, ॲड. संभाजीराव मोहिते, श्री. रमेश पवार, श्री. ए.आर. पवार, प्रा. जालिंदर काशीद, श्री. शिंदे आणि सौ. वर्षा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात शिवार फेरी, परिसरातील वनस्पती, पक्षी व फुलपाखरे निरीक्षण, यासारख्या प्रत्यक्ष अनुभव मिळवणाऱ्या सत्रांचा समावेश होता. कृष्णा महाविद्यालयाचे प्राचार्य व वनस्पती तज्ज्ञ डॉ. सी.बी. साळुंखे, पेठ वडगाव येथील पक्षी अभ्यासक डॉ. अमोल पाटील, पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार व पक्षी मित्र श्री. राजेंद्र कदम यांनी देखील शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजन प्रा. जालिंदर काशीद, श्री. चंद्रकांत जाधव व श्री. प्रबोध पुरोहित यांनी केले. सौ. सोनटक्के, सौ. काशिद, सौ. पुरोहित, प्रा. संतोष आंबवडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

निसर्ग कृती सत्रात पाऊस मोजणे, निसर्ग ग्रीटिंग कार्ड तयार करणे, पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनवणे, सिड बॉल तयार करणे, व कृषी औजारांची ओळख अशा उपक्रमांची आखणी करण्यात आली. याशिवाय प्लास्टिक निर्मूलन, कचरा व्यवस्थापन, स्लाईड शो, निसर्ग भ्रमंती, आणि प्रदूषण विषयक जनजागृती ही सत्रेही घेण्यात आली.

शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्गज्ञान भित्तीपत्रकांचे प्रदर्शन, दुर्बिणीतून पक्षी निरीक्षण, आणि छायाचित्रण स्पर्धा यांसारख्या उपक्रमांनी सहभागींना समृद्ध अनुभव दिला. शिबिरात विविध पक्ष्यांचा अभ्यास व पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात यश आले.

हे शिबिर निसर्गप्रेमींसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments