Tuesday, July 29, 2025
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील सौर ऊर्जेचे पहिले सरकारी कार्यालय साताऱ्यात.....

महाराष्ट्रातील सौर ऊर्जेचे पहिले सरकारी कार्यालय साताऱ्यात…..

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहराचा ऐतिहासिक वारसा आजही जतन केला जातो. साताऱ्यातील बस स्थानक शेजारील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सध्या सौर ऊर्जावर चालणारे उपकरण बसविण्यात आले आहे. दिनांक १२ मे रोजी बुद्ध जयंतीच्या निमित्त या सौर ऊर्जा उपकरणाचे उद्घाघाटन होत असल्याने स्वयंप्रकाशित व्हा हा संदेश दिला जाणार असा अंदाज आहे.
सातारा बस स्थानक शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयामध्ये गेल्या वर्षी प्रतापगड येथील शिवप्रताप इतिहास घडवणाऱ्या वाघ नखे थेट इंग्लंड मधून राणी एलिझाबेथ म्युझियम येथून मोठ्या पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात आगमन झाले. तेव्हापासून हे संग्रहालय सर्व शिवप्रेमींसाठी तीर्थक्षेत्र बनले होते. या वस्तू संग्रहालयाचे अधीक्षक श्री प्रवीण शिंदे व श्री गायकवाड तसेच इतर कर्मचाऱ्यांनी वाघ नखे आगमन ते साताऱ्यातून पुन्हा सुरक्षितरीत्या इतर ठिकाणी पाठवण्यासाठी परिश्रम घेतले होते. सुरक्षेच्या कारणामुळे डोळ्यात तेल घालून जबाबदारी पार पाडली होती. आता या ठिकाणी शिवकालीन महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे . लवकरच शिवप्रेमींसाठी ती खुली करण्यात येणार आहे.
त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या वतीने २४० वॅट उत्पादन करणारी सौर ऊर्जा पॅनल टाकण्यात आलेले आहे.९३ सौर ऊर्जा पॅनल मधून ५८५ वॅट वीज उत्पादन होणार आहे. याची लांबी अडीचशे फूट असून त्यामुळे स्लॅबची संरक्षण झालेले आहे.
शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या दिवशी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होईल. अशी अपेक्षा आहे. वेध महिला बचत गट विपणन महामंडळाच्या वतीने पंधरा दिवसापासून पन्नास के.वी. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम झाले आहे. यामुळे दीड लाख रुपये ची बचत होणार आहे. जशा पद्धतीने शासकीय कार्यालयात झिरो पेंडेन्सी राबवण्यात येते त्या पद्धतीने आता शून्य वीज देयक होणार असल्याने ती एक क्रांती ठरली आहे.
या पॅनलची २५ वर्ष आयुष्यमान आहे. पुरातन विभागाच्या निधीतून हे काम झाले असल्याने ते उत्कृष्ट झालेले आहे. यासाठी पुरातन विभागाचे संचालक व संबंधित तांत्रिक विभागाचे अधिकारी वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयामध्ये वस्त्र विभाग, संक्रम विभाग, चित्र विभाग पूर्ण झाले असून युनेस्कोने मान्यता दिलेल्या बारा किल्ल्यांची प्रतिकृती ही तयार होऊन ती खुली होणार आहे. त्यापूर्वी फ्रान्स येथे बैठक होईल. अशी माहिती घेण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील शासकीय कार्यामध्ये सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी संग्रहालय व पुरातन विभागाचे कौतुक केले आहे. सध्या तापमान वाढीस लागलेले असून ते सौर ऊर्जेसाठी अनुकूल आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पोषक वातावरण असल्याचे तांत्रिक माहिती मिळाली आहे.

______________________________
फोटो छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयातील सौर ऊर्जा प्रकल्प (छाया– अजित जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments