Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रबापमाणूस’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन

बापमाणूस’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन

प्रतिनिधी : वडिलांविषयी फारसं कोणी लिहित नाही म्हणून वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्या भावना एकत्र करण्यासाठी ‘बापमाणूस’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. या कवितासंग्रहाचे प्रकाशन स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि.9 सप्टेंबर, 2025 रोजी करण्याचे नियोजन आहे.

प्रथम नाव नोंदवणाऱ्या कवींना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. कवितेसोबत कविचे पूर्ण नांव, पत्ता, आयडेंटी फोटो, जास्तीत जास्त 5 ओळींमध्ये स्वतःबद्दलची माहिती पाठवावी. कवितेचा विषय वडील, बाप, पिता इ.असावा. मराठी मुळाक्षरांप्रमाणे आडनावातील पहिल्या अक्षरानुसार कवितेंचा क्रम असेल. प्रत्येक कविला या काव्यसंग्रहाच्या 2 प्रती व आकर्षक सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी रु.500/- मुल्य असणार असून ते संदीप राजाराम डाकवे, आयडीबीआय बॅंक शाखा कुंभारगांव, खाते क्रमांक. 0625104000046844 या खात्यावर किंवा 9764061633 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे वरती पाठवावे.
विशेष म्हणजे या उपक्रमातून जमलेल्या रकमेपैकी काही रक्कम शेतकरी बांधवांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण पाठवलेल्या कविता प्रसिध्द तर होतीलच परंतू गरजूंना मिळालेल्या मदतीमुळे त्याचे मुल्य देखील वाढणार आहे. तरी या उपक्रमांसाठी कविंनी आपल्या किमान 30 ओळीपर्यंतच्या 2 कविता संदीप डाकवे मो.9764061633 या मोबाईल क्रमांकावर व्हाॅटसअप कराव्यात किंवा sandeepdakve@gmail.com या ईमेल वरती गुरुवार दि.31 जुलै, 2025 अखेर पाठवाव्यात.
वाचन संस्कृती आणि साहित्यिकांस प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट आणि डाकवे परिवार यांच्या वतीने ग्रंथतुला करून पुस्तक वाटप, मान्यवराचे स्वागत पुस्तकाने, ग्रंथालयास पुस्तके वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा पुस्तक देवून सन्मान, प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशन, 10 पुस्तकांचे प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तके भेट, वार्तांकन स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय, पुस्तकांचं झाड, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, स्पंदन उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार असे नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे. वडिलांविषयी कविता असणारा हा अनोखा आणि एकमेव कवितासंग्रह असून यात जास्तीत जास्त कविंनी सहभाग व्हावे असे आवाहन मत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments