तळमावले/वार्ताहर : शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे हे गेली 19 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सन 2017 पासून गरजूंना मदत केली जात आहे. त्यामुळे अक्षरगणेशा उपक्रमातून गरजूंना आर्थिक मदतीरुपी आशिर्वाद मिळत आहे. या अक्षरगणेशा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गतवर्षाच्या गणेशोत्सवामध्ये स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून ‘एक अक्षरगणेशा रुग्णांसाठी’ असा उपक्रम राबवला होता. या उपक्रमात अक्षरगणेशा रेखाटून घेणाऱ्याकडून मुल्य स्वीकारले होते. यामध्ये जमलेली व स्वतः डाकवे परिवाराने काही रक्कम टाकून रु.5 हजारची रक्कम उमरकांचन (ता.पाटण) येथील धनाजी मोहिते यांना दवाखान्याच्या उपचाराकरिता सुपुर्द केली. चि.स्पंदन डाकवे याच्या 10 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा उपक्रम राबवण्यात आला.
डाॅ.संदीप डाकवे प्रतिवर्षी गणेशोत्सवामध्ये अक्षरगणेशा उपक्रम राबवतात. यापूर्वी त्यांनी अक्षरगणेशा व कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मंदीर जीर्णोद्धारासाठी रु.63 हजार, नाम फाऊंडेशनला रु.35 हजार, केरळ पुरग्रस्तांना रु. 21 हजार, विविध सामाजिक उपक्रमासाठी 10 हजार, अन्नदानासाठी 7 हजार 778, विद्यार्थ्यांच्या फी साठी रु.6 हजार, इर्शाळवाडी आपत्तिग्रस्तांसाठी रु.5 हजार 555, ईशिता पाचुपतेला रु.5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5 हजार, भैरी पाणी योजनेसाठी रु. 5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5 हजार, मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 ला रु.4 हजार, मुख्यमंत्री सहायता निधीस रु.3 हजार, शांताई फौंडेशनला 2 हजार 222, भारत के वीर या खात्यात रु.1 हजार, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक रु.1 हजार अशी रोख स्वरुपात मदत केली आहे. अर्थात हे सर्व लोकसहभागातून केले असल्याचे डाॅ.संदीप डाकवे हे जाहीररीत्या कबूल करतात.
डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेल्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये एकदा तर वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड बुक मध्ये दोनदा झाली आहे. डॉ.संदीप डाकवे यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी 75 पेक्षा जास्त तर महाराष्ट्र शासनाने 6 पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले आहे. याशिवाय त्यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपट सेटवर जावून आपली कला सादर केली आहे. डाॅ.गिरीश ओक, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, जयराज नायर, संजय नार्वेकर, डाॅ.अमोल कोल्हे, अशोक शिंदे, रविंद्र बेर्डे, सुरेखा कुडची, वैभव मांगले, भाऊ कदम, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी, महेश सलागरे, सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते, सागर कारंडे आदींसह विविध क्षेत्रातील सुमारे 15 हजाराहून अधिक मान्यवरांना कलाकृती दिल्या आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार भरत जाधव, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, डाॅ. गिरीश ओक, माधव अभ्यंकर, कमलाकर सातपुते, संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख या सेलिब्रिटींसमोर त्यांच्या नावातील लाईव्ह अक्षरगणेशा रेखाटत त्यांच्या कडून शाबासकी मिळवली आहे.
विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना आपल्या जादुई कलेच्या माध्यमातून भुरळ पाडणाऱ्या डाॅ.संदीप डाकवे यांचा अक्षरगणेशा थेट कॅनडा आणि अमेरिका या परदेशात पोहोचला आहे.
समाजिक संस्था, ट्रस्ट आणि मंडळे यांनी विविध कार्यक्रमप्रसंगी अक्षरगणेशा उपक्रम राबवल्यास त्यातून गरजूंना भरघोस मदत करता येईल. ‘एक अक्षरगणेशा’ या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे.
अक्षरगणेशा उपक्रमातून गरजू रुग्णांसाठी खारीचा वाटा म्हणून रु.5 हजारची मदत देवून डाॅ.संदीप डाकवे व स्पंदन ट्रस्टने अक्षरगणेशातून मदत ही परंपरा जपली आहे.
डाॅ.संदीप डाकवेंच्या अक्षरगणेशातून गरजूंना मिळतोय ‘आशिर्वाद’
RELATED ARTICLES