Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रसांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना गेट व ऑफ इंडिया, मुंबई येथे 20...

सांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना गेट व ऑफ इंडिया, मुंबई येथे 20 एप्रिलला कार्यक्रम

मुंबई :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रविवार, 20 एप्रिल, 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधासभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात सुरेश वाडकर, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, आदर्श शिंदे, मिलिंद शिंदे, नंदेश उमक, अवधूत गुप्ते व शाहीर राजा कांबळे हे कलाकार सहभागी होणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करणार आहेत. या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीते, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments